वरोरा येथील २६ वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या
संशयित आरोपी घटना स्थळावरून फरार
मारेगाव वार्ता
वरोरा शहरातील अंबादेवी नगरा नजिक असलेल्या महादेव मंदिर जवळ २६वर्षीय साजिद शेख उर्फ शेख आबीद शेख त्याचे नाव युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना आज शनिवार दि.१५मे रोजी सांयकाळी ७.३०वाजता वरोरा शहरात घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.मृतक साजिद शेख उर्फ शेख आबीद शेख वरोरा येथील आझाद वार्डातील रहिवासी असुन त्याचे
अवैध धंद्याशी संबंध असल्यामुळे महादेव मंदिरा जवळ एका झोपडी मध्ये साजिद शेख उर्फ आबीद शेख त्याचे नावशेख त्याचे नाव असल्याने तिन संशयित आरोपींनी गाडी मधून उतरून त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याने आरोपी घटनास्थळावरून पोबारा केला असुन साजिद शेख उर्फ आबीद शेख याच्या मृतदेहा जवळ बंदुक ठेवून पसार होण्यात यशस्वी झाल्याने वरोरा पोलिसांनी संशयित आरोपींना पकडण्यासाठी वरोरा शहरामध्ये नाकाबंदी लावले असून आरोपीच्य शोधण्यासाठी वरोरा शहरात पंथके पाठवण्यात आली असुन आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळणार का वरोरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.