मारेगावात भव्य रक्तदान शिबीर
संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेचे आयोजन
पंकज नेहारे
सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर रूग्नाना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नसल्याने , छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ मे २०२१ ला सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर नगरपंचायतच्या तळमजल्यावर आयोजीत करण्यात येत आहे, त्यांत जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदान करून कोरोनामुळे आलेल्या राष्ट्रीय आपत्ती दुर करण्यासाठी सहकार्य करावे असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. १४ मे २०२१ ला सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत करण्यात आले, सध्या कोरोना संकटानी सर्व सामान्य नागरीक ग्रस्त असून बाधीत रुग्नाना कधीही रक्ताची गरज भासु शकते ,रक्त पेढीत पहिलेच रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाच्या वतीने गावोगावी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करण्यात आले , त्या आवाहनाला ओ देत संभाजी ब्रिगेडच्या वतीने छ. संभाजी महाराज जयंती निमित्य शुक्रवारला सकाळी १० ते सायं ५ वाजताच्या दरम्यान नगरपंचायत भवन येथे जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्तदान करावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोब, तालुकाध्यक्ष लहू जिवतोडे, कुंदन पारखी,प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, राहूल घागी यांनी केले आहे.