कान्हाळगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यातील कान्हाळगाव (वाई)येथील शेतकऱ्याने कीटकनाशक द्रव्य प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.१२ मे रोजी घडली.
दिलीप रामराव झाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या चे नाव असुन दि.१२ मे रोजी स्वत:चे शेतात कीटकनाशक द्रव्य प्राशन केले.पुढील उपचारार्थ पांढरकवडा येथे दाखल करण्यात आले असता १३ मे रोजी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तुर्तास आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.