टास्क फोर्स च्या माध्यमातून पाझरतोय माणुसकीचा ओलावा...!
वर्धेचे कराळे सर भागवितेय भ्रांत!
रोहन आदेवार
मो-7875380754
वर्धा: राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे वर्धा येथेही जिल्हाधिकारी वर्धा यांनी दवाखाने व मेडिकल वगळता वर्धा जिल्हा सर्व बंद चा आदेश दिला आहे. त्यामुळे अनेक लोकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येईल का? अशी भीती वाटू लागली आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनमध्ये कराळे सरांनी व त्यांच्या टीम नि पुढे येऊन रस्त्यावर राहणाऱ्या तसेच गरजू- गरिबांना मदतीचा हात दिला होता. या मदतीमुळे अनेक कुटुंबाची रोजची दोन वेळची भूक भागवली जात होती.
तसेच याही वर्षी कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक रस्त्यावर राहणाऱ्या गरीब आणि गरजू हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. मात्र यावेळी कोरोना काळात कराळे सरांनी व त्यांची अँटी कोरोना टास्क फोर्स टीम गरीब गरजू लोकांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धावून आली आहेत. या फोर्स च्या माध्यमातून राज्यातल्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये देखील गरीब आणि गरजू लोकांना अन्न वाटप, धान्य वाटप, फळ वाटप, सॅनिटरी, मास्क व औषधी वाटप करून मदतीचा हात दिला जातोय. व काही समाजातील लोकांकडून गरजवंताला प्रत्यक्ष मदत देता येत नसल्याने ती मदत कराळे सर कडे ते ऑनलाइन पाठवून कराळे सरांच्या कार्याला हातभार लावत आहेत. तसेच कोणाला मदत करायची असल्यास मदतीसाठी फोन पे, गुगल पे, आणि भीम अँप 8485078798 अतुल लेंडे या मोबाईल no. पाठवण्याचे आवाहन ही या फोर्स नि केले आहे.
कराळे सर च्या टीमचे कार्य बघून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जणू टास्क फोर्स च्या माध्यमातून माणुसकीचा ओलावा पाझरताना दिसत आहे. या फोर्स कडून जी मदत दिली जात आहे ती गरजू लोकांच्या कामी पडत असल्याचे दिसून येत आहे मात्र या वर्धेतील राजकीय नेते क्वारंटाईन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या फोर्स मध्ये नितेश कराळे सर, उराडे सर, अतुल लेंडे, मोहित सहारे, आकाश कुंभारे, संदेश, पंकज, आकाश, स्वप्नील, रणजित कांबळे, विवेक कोडेपल्ली, प्रतीक भोमले व फिनिक्स अकॅडमी व वाचनालयाचे विद्यार्थी सहकार्य करीत आहे तर लॉकडाऊन असल्याने आपआपल्या गावोगावी गेले ले फिनिक्स अकॅडमी चे विद्यार्थी सुद्धा आपआपल्या गावात तालुक्यात मदत करत आहेत.