कोरोना अपडेट...
तालुक्यात केवळ एक पॉझिटीव्ह
- मारेगावात शुन्य
- बरे झालेत एकोणीस
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात कोरोनाचा आलेख अनपेक्षितपणे कमी होत आज गुरुवारला तालुक्यात केवळ एक जन पॉझिटीव्ह निघाला.मारेगाव शहरात सलग पाचव्या दिवसाला शून्याची नोंद झाली आहे.तालुक्यात कोरोना संसर्गजन्य बधितांचा आकड्यात घट होत आज मागील कित्येक दिवसाचे विक्रमी आकडे मोडीत काढल्याने तालुक्याला पुरता दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात कोरोना संसर्गाची आकडेमोड सातत्याने होत असतांना आज बाधितांच्या आकड्यात विक्रमी घट झाली आहे.त्यामुळे मानवी मनातील तणाव काहीसा सैल होतांना दिसतो आहे.येणार्या दिवसात बाधितांच्या आकड्यात स्थिरता कायम राहिल्यास संचारबंदी सह लॉकडाउन हटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तालुक्यातील कोरोना बाधितांचा दर अत्यल्प असल्याने जनजिवन पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे.मात्र शासनाच्या निर्णयावर आगामी नियोजन अवलंबून आहे.
दरम्यान आज प्राप्त अहवालात तालुक्यातील म्हैसदोडका येथील एकमेव इसम पॉझिटीव्ह आहे.सदर बाधित हा रँ पिड तपासणीतील आहे.आरटी- पीसीआर चे ८०० जणांचा अहवाल वृत्त लिहिपर्यंत प्राप्त झालेला नव्हता.मारेगाव शहराला आजही बाधितातुन सूट मिळाली आहे.
तालुक्यात बरे झालेल्यांची संख्या १९ वर असुन हे सर्वजण घरी परतले आहे.अँक्टिव ची संख्याही फुगत १५० वर आहे.