चिंचमंडळ मध्ये पाणी पेटले !
- प्रशासनाच्या बेताल भूमिकेने ग्रामस्थावर जल संकट
- लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे प्रशासनाच्या बेताल भूमिकेचा परिपाक समोर आला आहे.लोकप्रतिनिधींच्या नियोजन शुन्याने ऐन रखरखत्या उन्हाळ्यात ग्रामस्थावर पुरते जलसंकट ओढावले आहे.त्यामुळे ग्रामस्थात प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील चिंचमंडळ येथील नऊ सदस्यींय ग्रामपंचायत प्रशासन आहे.अडीच हजारचे आसपास असलेल्या लोकसंख्येला पाण्याने पुरता हरताळ माजविला आहे.यावर ग्रा.पं.पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाण्यासाठी जनतेचे हाल पहात आहे.नागरिकांनी याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळ मारुन नेत असल्याचा आरोप होत असुन ग्रामस्थांचे मात्र पाण्यासाठी बेहाल होत आहे.
येथील पाच हातपंप असुन केवळ दोन हातपंप सुरु आहे.यातील एक हातपंप अखेरच्या घटका मोजत असल्याचे वास्तव आहे.तीन बंद हातपंप करिता स्थानिक प्रशासन मागील अनेक दिवसापासून कुंभकर्णी झोप घेत मुग गिळून आहे.या समस्येने नागरिकांची पुरती वाट लागुन तप्त उन्हात ससेहोलपट होत आहे.
दरम्यान चिंचमंडळ गावालगत वर्धा नदी वसलेली आहे.तब्बल साडेतीन कि.मी.च्या अंतर असलेल्या नदीतुन जलवाहिनीच्या माध्यमाने गावातील सार्वजनीक विहिरीत पाणी सोडले जाते.मात्र पुरवठा करणारी यंत्रणा येथे कुचकामी ठरत असल्याने पाण्याचा स्रोत अत्यल्प प्रमाणात तोही दुषित होवून याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा टाहो फुटत आहे.त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी त्रेधातीरपट उडून झुंबड उडते आहे.पाण्यासाठी होत असलेला संघर्षाला पुर्ण विराम देण्यासाठी बेताल प्रशासन व अधिकारी चुप्पी साधून आहे.काही कर्मचारी उंटावरुन शेळ्या हाकलीत नागरिकांच्या मुलभुत गरजेवर सपशेल नापास झाल्याने सर्वत्र संताप प्रशासनाप्रती व्यक्त होत आहे.
चिंचमंडळ येथे ऐन उन्हाळ्यात प्रशासनाच्या नियोजनशुन्याने नागरिकांची वाट लागुन पाणी पेटले आहे.त्यामुळे येणार्या चार दिवसात संतापलेल्या नागरिकांकडुन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.तशा आशयाचे निवेदन वरिष्ठ प्रशासनकडे देण्यात येणार असल्याची माहिती येथील माजी ग्रा.पं.सदस्य दिवाकर सातपुते यांनी दिली.