५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद
तेलंगणा राज्यातून अटक
मारेगाव वार्ता/ जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
उमरखेड शहरात आपल्या घरा शेजारी राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी, संशयित आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला वय (५) रा साणकवाडी नगर उमरखेड यांच्यावार कलम ३७६(अ)३७६(ब) ४,८ पोक्सो अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. संशयित आरोपी चिमुरडीवर लिंगी का अत्याचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होत.त्यानुसार संशयित आरोपीवर गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार होता.
फरार झाल्याने उमरखेड पोलीस आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविण्यात होती अवघ्या २४तासात संशयित आरोपी नजीर उस्मान शेख दौला त्याला तेलंगणा राज्यातील नवी पेठ येथून गुरूवारला दुपारी ३वाजता अटक करण्यात आली. संशयित आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे एपीआय गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई अंकुश शेळके, होमगार्ड समिर आसिफ यांच्या पथकाने अटक केली पुढिल तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय अधिकारी वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलिस करत आहे