Type Here to Get Search Results !

स्वर्णलीला शाळेची फी दर वाढ..

स्वर्णलीला शाळेची फी दर वाढ... नियमांचे उल्लंघन करून फी द्वारे पालकांची लूटमार,  शाळेवर पालकांचा मोर्चा ?
     
          मारेगाव वार्ता
जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार
           यवतमाळ

शालेय फी वाढ खपऊन घेणार नाही !पालक एकतेचा आवाज होत आहे. सध्या देशात कोरोनाने कर केला असून जागतिक पातळीवर देशाच्या उत्पन्न पातळीने नीचांक गाठला आहे.  सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्न घसरणीचे कारण असून या व्यवस्थेची झळ सहन करण्याची आर्थिक शक्ती आता राहिली नसल्याने या पुढे वाढीव शालेय शिक्षण फी खपऊन घेणार नाही असा इशारा पालकांनी दिलेल्या निवेदनातुन केला आहे.   
 आज दिलेल्या निवेदनातून मागणी करताना ते बोलत होते की,  दि  १८ मे २०२१ ला २०२१-२२ या सत्राकरिता स्वर्णलीला शाळेने वाढविलेली फी वाढ रद्द करावी व पुढील ऑनलाइन क्लासेस चालू राहील तो पर्यंत मागील सत्राप्रमाणे ५० टक्केच फी भरली जाईल अशी चर्चा शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे सोबत निवेदन देते वेळी आर्थिक परस्थितीचे कथन करून  करण्यात आली.तसे लेखी स्वाक्षरीचे पालकांनी  निवेदन देऊन आपल्या व्यथा कथन केल्या यावेळी कोविड नियमांचे पालन करावयाचे असल्याने काही मोजकेच पालक सर्वांचे प्रतिनिधी म्हणून शाळेत गेले होते. शाळेला लेखी पत्राद्वारे आपण त्यांचा निर्णय कळविण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला आहे. त्याबाबत त्यांचे शाळेच्या व्यवस्थापन  समिती शी बोलून तुमची मागणी वर चर्चा करून निर्णय सांगण्यात येईल असे मुख्याध्यापिका यांनी सांगितले. त्याच प्रमाणे नवीन ऍडमिशन घेणाऱ्या कडून २००० रुपये रजिस्ट्रेशन फी(डोनेशन किंवा ऍडमिशन फी) घेतले जात आहे व त्यांना स्वर्णलीला शाळेची पावती न देता 'अल फ्रोस' अकॅडमी ची पावती दिली जात आहे, याबाबत पुराव्या सह मुख्याध्यापिका यांना विचारले असता त्या निरुत्तर झाल्या अशा प्रकारची कोणतीच रक्कम शाळेला नियमानुसार घेता येत नाही,शाळेने पालकांची फसवणूक व लुटमार सुरू केल्याचे या वरून दिसून येते, अखेरिस आमचे सोबत असणाऱ्या एका पालकांना 2)२००० रुपये ट्युशन फी मध्ये वळते करून देतो असे त्यांनी सांगितले. शाळेने पालकांची आर्थिक लुटमार सुरू केली असून नवीन ऍडमिशन घेणाऱ्या पालकांना नवीन फी बाबत काहिच  माहिती दिली जात नाही, शाळेतील शिक्षकांना  टार्गेट देऊन घरोघरी  पाठवून ऍडमिशन करायला लावल्या जात आहे व त्या शिक्षकाला प्रत्येक ऍडमिशन मागे कमिशन दिले जात आहे, त्यामुळे ते शिक्षक नवीन ऍडमिशन धारकांना खोटी बतावणी करून खोटी पावती देऊन २००० रुपये उखळत आहे. या बाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी व आपले जवळील नवीन ऍडमिशन घेणाऱ्या पालकांनी २००० रुपये देऊ नये व ज्यानी दिलें असेल त्यांनी शाळेत जाऊन वापस मागावे असे सांगावे...आता २०२१-२२  या सत्रात शाळेने केलेली फी वाढ रद्द करण्याच्या बाबतीत शाळा आठवडा भऱ्यात काय निर्णय घेते ते पाहूया..... असा इशारा दिला अभिजित दरेकर, देवेंद्र बच्चेवार यांनी म्हटले आहे की जर फी वाढ रद्द न केल्यास पुढील पाऊल आम्ही सर्वजण मिळून उचलनार व आमची रास्त मागणी पूर्ण करून घेऊ असा पालक एकतेचा संदेश यावेळी शाळा व्यवस्थापन समितीला दिला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies