मारेगाव तालुका येथील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा ,अनिल पारखी मनसे कोलगाव
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील लसीकरण मोहिमेला तेज़ गतीने वेग कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करीत मनसे नेते अनिल पारखी कोलगाव यानी केला आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असुन या आजारने मृत्युचे थैमान मोठ्या प्रमाणात घातले असून.तिसरी लाट ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येणार असल्याची शक्यता काही तज्ञाने केले असून त्यामुळे
परिस्थिति हाता बाहेर जाऊ नये कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी लसीकरण ही सर्वात मोठी भूमिका आहे. मारेगाव तालुक्यातील वेग धिम्मी गतिने चालला आहे.लसीकरण केंद्र कमी असल्यामुळे१८ ते ४५वर्षे वयोगटातील रुग्णाना कोरोना आजार घातक ठरला आहे याशिवाय ४५ वरील जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्र सुरु असून सुद्धा लस पुरवठा कमी पडत असुन काही केद्राच्या ठिकाणी लस सुध्दा उपलब्ध नसल्याने अनेक .नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर त्रास सहन करावा लागत आहे .समोर हा त्रास जास्त होऊ शकतो.
ही बाब लक्षात घेता प्रशासनाने मारेगाव तालुक्यातील लसीकरणाची मोहिम जलद गतिने वाढवावी अशी व केंद्रावर नसेल तर लसचा पुरवठा उपलब्ध आताच उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी अनिल पारखी मनसे नेते कोलगाव यांनी केली आहे .