कोरोना अपडेट ...
तालुक्यात ३९ बाधीत
मारेगाव शहरात केवळ ०२
बरे झालेले रूग्ण १७
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाने आज शनिवार ला बाधितांचा आकडा फुगवत ३९ वर नेला.यातील मारेगाव शहरात केवळ ०२ पॉझिटीव्ह निघालेत.बरे झालेल्या रुग्णात दिवसागणिक वाढ होत १७ जन घरी परतले.
मारेगाव तालुक्यातील बाधीत रुग्णाची संख्या कमी जास्त प्रमाणात आहे.मागील आठवड्याच्या तुलनेत सप्ताहात दिलासा देणारे आकडे समोर येत आहे.यातील बरे झालेल्या रूग्ण संख्येतही लक्षणीय वाढ होतांना दिसत असतांना कोरोना संसर्गाची साखळी खंडीत झाल्याचे चित्र सद्यास्थितिच्या आकडेवारी वरुण दिसते आहे.
परिणामी आज शनिवार ला प्राप्त अहवालात ३९ जन पॉझिटीव्ह निघालेत.यातील मारेगाव शहरातील केवळ दोन जन बाधीत निघालेत.उर्वरित वसंतनगर,वागदरा,पाथरी,रामेश्वर व वेगाव येथील रूग्ण आहेत.आज तब्बल १७ जनांनी कोरोना वर मात करित घरी परतले.दरम्यान आज आरटी-पीसीआर मधील ३४ तर रँपिड मधील पाच रूग्ण आहेत.