राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे आरोग्य विभाग कडून तपासणीसाठी पथक हजर
चेतन वर्मा: राळेगाव तालुका प्रतिनिधी,
राळेगाव तालुक्यातील वनोजा गावात अनेक दिवसापासुन सर्दी खाेकला, ताप या आजाराने थैमान घातले व मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले, असुन या अनुशंगाने वनोजा गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार राळेगाव यांना आरोग्य तपासणी कँप लावण्या बाबत पत्र देण्यांत आले त्या पत्राची एक प्रत गटविकास अधिकारी राळेगाव यांना
देण्यात आली व वृत्तपत्रांतून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. सरपंचाच्या पत्राची दखल घेऊन व वृत्तपत्राची दखल घेऊन आज दिनांक ५/५/२०२१ रोजी वनोजा गावात आरोग्य तपासणी पथकाने हजेरी लावून तपासणी सुरू केली आरोग्य पथकाने शंभर कीट आणल्या होत्या त्यापैकी९९ लोकांची कोरोना तपासणी केली असता एक रूग्न पांजिटिव्ह आढळून आला असून या तपासणी शिबीराला राळेगाव तहसिलदार डॉ. कानडजे व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सचिव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.