मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष अनामिक बोढे यांना पत्नीशोक
मारेगाव : सचिन मेश्राम
शहरातील राज इलेक्ट्रॉनिक्स फर्नीचर चे संचालक तथा मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष अनामिक बोढे यांच्या सुविज्ञ पत्नी आशा अनामिक बोढे यांचे चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्या ४२ वर्षाच्या होत्या.
मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृतीत कमालीचा बिघाड झाल्याने त्यांना चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते.यात त्या हृदय शस्त्रक्रिया पश्चात कोविड पॉझिटीव्ह निघाल्याने दि.०३ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालविली.ही दु:खद बातमी मंगळवारला मारेगाव शहरात पसरताच शोककळा पसरली.
शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये वास्तव्यात असलेले आशा अनामिक बोढे यांच्या पश्चात पती, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.