मारेगाव तालुक्यात ५८ बाधीत
- मारेगावात ११
मारेगाव : सचिन मेश्राम
कोरोना संसर्गाचे आलेख वाढत असतांना आज बुधवारला मारेगाव तालुक्यात बाधितांचा आकडा ५८ वर पोहचला.मारेगाव शहरातील ११ जन पॉझिटीव्ह निघालेत.त्यामुळे वाढत्या रुग्णाने मारेगाव तालुक्यात चिंतेचे सावट निर्माण होत आहे.
कोरोना संसर्गाने संपुर्ण तालुका घेरला आहे.त्यामुळे दिवसेंदिवस बाधितांचे आकडे फुगत आहे.आज प्राप्त अहवालात मारेगाव तालुक्यात ५८ बाधीत निघालेत यात मारेगाव शहरातील पॉझिटीव्ह चा आकडा ११ आहे.उर्वरित आकडेवारी ग्रामीण भागातील असुन गावनिहाय आकडेवारी समजू शकली नाही.