सुप्रिया जोगी यांची मारेगाव तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
मारेगाव वार्ता
मारेगाव तालुका प्रतिनिधी
भास्कर राऊत
मारेगाव तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ. सुप्रिया प्रविण जोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती वनमालाताई राठोड यांनी सौ. सुप्रियाताई जोगी यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या विचाराने पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल करावी तसेच पक्षकार्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त केल्या.
मारेगाव तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आपण काँग्रेस पक्ष तालुक्यात घराघरांत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने पुढाकार घेऊन पक्ष मजबूत करण्यावर आपली प्राथमिकता राहील असेही मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार श्री. वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. नरेंद्र पाटील ठाकरे, जी.प.सदस्या सौ. अरुणताई खंडाळकर व सर्व जेष्ठ नेत्यांना दिले.