२५ वर्षीय युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील बोदाड येथील घटना
मारेगाव वार्ता
तालुका प्रतिनिधि / पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील मार्डी जवळच असलेल्या बोदाड येथील वैभव सुभाष लांबट या २५ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना बोदाड येथे घडली.
बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक मुलगा वैभव याने आपले शेतात टरबुजाचे पीक घेतले परंतु सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनने टरबूज पिकावर संकट ओढवले या टरबुजाचे शेतीने खाजगी स्वरूपाचे दोन ते तीन लाखाचे कर्ज झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या वैभवने २ मे रोजी दुपारच्या सुमारास स्वतःचे शेतात विष प्राशन केले. तब्येत अत्यवस्थ असल्या कारणाने चंद्रपूर येथे हलविण्यात आले
परंतु संध्याकाळी 7 वाजता प्राणज्योत मालवली. शांत व सयंमी स्वभाव असलेल्या वैभवच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.वैभव यांच्या पश्चात आई-वडील एक विवाहित बहिण आहे असा आपत्य परिवार आहे