दुचाकी अपघातात मारेगावची युवती जागीच ठार , युवक गंभीर
बोटोणी नजीक घटना
बोटोणी : जयप्रकाश वनकर
मारेगाव तालुक्यातील बोटोणी राज्य महामार्गावर दुचाकीला अपघात होवून मारेगाव येथील युवती जागीच ठार तर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला सकाळी दहा वाजताचे दरम्यान घडली.
विशाल श्रावण भनारकर (२३)रा.कोंगारा ता.पांढरकवडा व आमिषा शंकर बुजाडे प्रभाग क्रमांक ७ मारेगाव हे दोघे स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम.एच.२९ बी. एन.२४०६ ने मारेगाव कडे येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.अशातच दुचाकीस्वार विशाल याचे वाहनावरुण नियंत्रण सुटल्याने दोघेही राज्य महामार्गावर कोसळले. यात आमिषा (२०) हिचा जागीच करुन अंत झाला तर विशाल यास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले.
मृतक अमिषा हिचे शवविच्छेदन करंजी येथील ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले असुन तिचे शव मारेगाव येथे आणण्याची प्रक्रीया सुरु आहे.