रिलायन्स फाउंडेशन व समता बहुउद्देशीय संस्था नेरच्या वतीने गरिब व गरजुंना किराणा किट वाटप.
प्रतिनिधी :लक्ष्मण वानखडे
नेर येथे दिनांक २२ मे २०२१ रोजी नायब तहसिलदार संजय भोयर यांच्या उपस्थितीत
किराणा किट ( गव्हाचे पीठ ५ किलो, साखर १ किलो, तुळदाळ १ किलो, मिठ १ किलो ,हळद पावडर पॉकेट ) , १ लिटर तेल पॉकेट व गुल्कोज डी. वाटत करण्यात आले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नेर येथे पोलीस स्टेशन नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या उपस्थितीत स्वप्निल निराळे पोलीस उपनिरीक्षक, ठाकुर पोलीस उपनिरीक्षक, राजेश चौधरी, इस्राईल आझाद सारर्जन होमगार्ड, अश्र्विन राठोड होमगार्ड व ईतर पोलीस कर्मचारी यांना सेनिटायजर व गुल्कोजडी वाटप करण्यात आले.
श्री. प्रफुल बन्सोड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. लक्ष्मण वानखडे अध्यक्ष समता बहुउद्देशीय संस्था व क्रिडा प्रसारक नेर, मनिष मेश्राम लोखंडवाला, रविभाऊ जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते, कदिर राहि , सतिश उरकुडे अध्यक्ष वं.ब.आ. , विनोद रंगारी सचिव वंं.बं.आ. वसिम मिर्झा पञकार ,राहुल मिसळे पञकार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रफुल बन्सोड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फाउंडेशन , लक्ष्मण वानखडे अध्यक्ष समता बहुउद्देशीय संस्था व क्रिडा प्रसारक नेर श्री. मनीष मेश्राम लोखंडवाला, रविभाऊ जयस्वाल सामाजिक कार्यकर्ता, सतिश उरकुडे अध्यक्ष नेर तालुका वं.ब.आ. विनोद रंगारी सचिव वं.ब.आ. वसिम मिर्झा पञकार यांनी अथक परिश्रम घेतले .