Type Here to Get Search Results !

मुकुटंबनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

मुकुटंबनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

पत्रकारांना शिवीगाळ प्रकरणी न्यूज असोसिएशन संघटने तर्फे ग्रामपंचायत ला निवेदन
   
                
    मारेगाव वार्ता/जिल्हा प्रतिनिधी
                    यवतमाळ
                रोहन आदेवार

झरीजामनी:-मुकुटंबन ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते तेथिल लोकसंख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात नेमले गेले आहे.मात्र काही मुजोर ग्रामपंचायत कर्मचारी पत्रकारांना देखील शिवीगाळ करताना चे काही क्षण चित्रे आपण पाहत आहो.असाच एक प्रकार मुकुटंबन ग्रामपंचायत हद्दीत घडला.संकेत गजानन गझलवार (पत्रकार) हे पाणी आणण्यासाठी गादेवार चौक मध्ये पाणी फिल्टर लावून असल्या कारणाने ते पाणी आणण्यास गेले असता.तेथील फिल्टर बंद अवस्थेत आढळून आले.संकेत ने ग्रामपंचायत मुकुटंबन चे सरपंच सौ.मीना आरमुरवार यांना फोन केला असता त्यांनी असे म्हटले की,मी एका कर्मचाऱ्यांना पाठवत आहे तो प्रॉब्लेम पाहून घेईल असे सांगितले. मात्र तिथे आलेल्या मुजोर कर्मचारी सुनील आरमुरवार याने पत्रकार संकेत गझलवार यांना अशलिल भाषेत शिवीगाळ केली.मात्र काही प्रमाणात ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार समोर येत आहे.ग्रामपंचायत मध्ये बरोबर कर्मचारी उपस्थित राहत नाही.सरपंच मॅडम कडे कोणतेही अर्जंट काम पडले तर सरपंच मॅडम घरी बोलवतात आणि आजून परेंत ग्रामपंचायत ने ग्राम दक्षता समिती ची देखील निवड नेमणूक केली नाही.कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.मात्र ग्रामपंचायत मार्फत कोणत्याही प्रकारचे नियोजन घेताना दिसत नाही आहे.फक्त पावती बुक घेऊन बाजारात वसुली साठी हिंडताना दिसतात.ग्रामपंचायत च्या खूप काही समस्या नागरिकांना त्रासदायक ठरताना दिसत आहे.मात्र त्या मुजोर कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत काय धडा शिकवेल हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.याच आशयाचे निवेदन न्यूज असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया च्या माध्यमातून ग्रामपंचायत ला देण्यात आले व आशा दारू पिऊन येणाऱ्या कर्मच्याऱ्यांना निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत च्या कोणत्याही कर्मचारी व सद्स्य यांनी यापुढे असे गैर प्रकार केल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तरी ही मागणी लवकर रात लवकर द्यावी ही विनंती आहे या वेळी संकेत गझलवार, गणेश मुद्दमवार,संघर्ष भगत,जयंत उदकवार, पुरूषोत्तम गेडाम इत्यादी निवेदन देतांना उपस्थित होते.
*दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व पत्रकार बांधवांची आहे.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies