कोरोना अपडेट....
मारेगाव तालुक्यात ५४ पॉझिटीव्ह
- शहरात अर्धा डझन बाधीत
- ३९ झाले बरे
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील कोरोनाचा लपंडाव आज कायम आहे.कालच्या तुलनेत आकड्यांची संख्या बेरजेत जमा होत तालुक्यात तब्बल ५४ जन पॉझिटीव्ह झाल्याची नोंद झाली.मारेगाव शहरात ०६ बाधीत होत आज शुक्रवारला ३९ बाधीत रुग्ण बरे झालेत.
कोरोना संसर्ग मारेगाव तालुक्यात आकड्याची कमीजास्त प्रमाणात आकडेमोड करीत मारेगाव तालुक्यात पॉझिटीव्ह ची संख्या तब्बल ५४ वर नेली.मागील तीन दिवसात बाधितांच्या आकड्यात कमालीची घट झाली असतांना आज कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले.त्यामुळे नागरीकांनी गाफील न राहता सजग राहण्याची गरज बनली आहे.
दरम्यान आज प्राप्त अहवालात ५४ बाधितात पुरुष ३० तर २४ स्रियांचा समावेश आहे.ग्रामीण भागात हा आकडा ४८ वर असुन ०६ जन मारेगाव येथील आहे.आज ३९ जन बरे झाले असुन बरे होण्याचे प्रमाण दिवसाला मोठ्या प्रमाणात आहे.मात्र आजच्या पॉझिटीव्ह आकड्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.