नागरिकांच्या धसक्याने दारुची पेटी सोडून स्कुटीस्वाराचा पोबारा
- बोटोणीतील घटना
- अवैद्य व्यवसायाची वरिष्ठाकडे करणार तक्रार : सरपंच सुनिता जुमनाके
मारेगाव : सचिन मेश्राम
मागील अनेक दिवसापासून बोटोणी येथे अवैद्य दारु व्यवसाय जोमात सुरु असुन या व्यवसायाचा खलनायकाने आज शनिवारला दारुची पेटी घेवुन चक्क बोटोणीत शिरकाव केला. मात्र लोकांचा जमाव दिसताच दारुची पेटी भर रस्त्यावर सोडून पोबारा केल्याने संशायितास पकडण्याचे आव्हान पोलिसा समोर उभे ठाकले आहे.परिणामी वारंवार होणार्या व्यवसायाची तक्रार यवतमाळ दरबारी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच सरपंचा सुनिता जुमनाके यांनी ' एल्गार ' शी बोलतांना केले.
बोटोणी आश्रम शाळेच्या कडेला राजरोसपणे अवैद्य दारुची विक्री जोमात सुरु आहे.त्यामुळे येथील कुटुंबात कौटुंबिक कलहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील काही दिवसापूर्वी येथील रगरागीनींनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मात्र अजुन डोके वर काढीत बोटोणीवासियांची डोकेदुखी वाढविली आहे.याबाबत वारंवार पोलिसांना माहिती देवुनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.परिणामी आज गावकरी टप्प्यावर असतांना आश्रम शाळेच्या बाजुला असलेल्या रस्त्याने एक स्कुटी चालक येत असतांना लोकांचा त्यास जमाव दिसला.हा घोळका पाहून बिथरलेल्या अवस्थेत चक्क दारुची पेटी रस्त्यावर सोडून स्कुटी चालकाने पोबारा केला.येथील सरपंच सुनिता जुमनाके,प्रशांत मत्ते,प्रकाश कोयचाडे,मोहन दडांजे,विमल पडाल,सुभद्रा नेहारे,आशा कोयचाडे,मैनाबाई मडावी,सुधा मडावी यांनी पोलिसां कडे माहिती दिली.त्यानूसार घटनास्थळावर पंचनामा करित दारुपेटी जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान बोटोणीत व्यसनाधीण युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असुन कौटुंबिक कलहातही वाढ होवून अवैद्य व्यवसायाची पाठराखण होत आहे त्यामुळे याबाबतची तक्रार आता थेट यवतमाळ च्या दरबारी पोहचविणार असल्याची माहिती सरपंच सुनिता जुमनाके यांनी दिली.