धक्कादायक....
मारेगाव तालुक्यात आज शतक पार पॉझिटीव्ह
- तालुक्यात १०४
- शहरात ०९ बाधीत
कोरोना संसर्गाचा उच्चांक दिवसेंदिवस वाढत असतांना मागील अनेक दिवसांचे विक्रम मोडीत मारेगाव तालुक्यात आज शुक्रवार रोजी शतकी बाधितांचा आकडा समोर आला.मारेगाव शहरात पॉझिटीव्ह चा आकडा ०९ च्या घरात आहे.
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस आपले पाय पसरत अख्खा तालुका घेरण्याचे प्रयत्न करतो आहे.सलग दिवसाला कमी जास्त प्रमाणात बाधितांचा आकडा फुगत असतांना तालुक्यावर चिंतेची गडद छाया पसरत आहे.
मारेगाव येथील कोविड सेंटर वर तपासणी करवून घेण्यासाठी झुंबड उडत आहे.दररोज शेकडो जन तपासणी करित असतांना आज धक्कादायक आकडा समोर आला.तालुक्यात तब्बल १०४ चा आकडा बाधीत केल्याने चिंतेत भर पडत आहे.मारेगाव शहराने हा बाधितांचा आकडा मात्र केवळ एकेरी आकड्यां वर ठेवीत ०९ आहे. त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेल्या बाधीत रुग्णाने जनता कमालीची प्रभावित होत आहे.