प्रभाग क्रमांक १७ मधील नादुरुस्त बोरवेल ८महिन्यांनंतर केली दुरुस्त ..
पंकज नेहारे
मारेगाव शहरातील मागील ८ महिन्यापासून प्रभाग क्रमांक १७ मध्ये असलेली बोरवेल नादुरुस्त असल्याची माहिती प्रभाग क्रमांक१७मधील नागरिक समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी यांना भेटुन ही माहीती दिली मागील अनेक महिन्यापासून येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत
होती.येण उन्हाळ्यात तर नागरिकांचे मोठे हाल होत असल्याने डॉ सचिन यांनी कुठलाही विचार न करता तात्काळ मेकॅनिक ला बोलावून बोरवेल लगेच दुरुस्त करून घेतली .बोरवेल ला खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी डॉ.सचिन शंकरराव मडावी,सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक१७च्या नागरिकांनी आभार मानले.