बोर्डा येथे अवैध देशी दारू सुरू
बोर्डा बिट जमादाराचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/पंकज नेहारे
वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बोर्डा गावातील मागील एक वर्षांपासून अवैध देशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.बिट जमादारा कडुन हात ठेवण्याची भुमिका घेतली जात असल्यामुळे वार्ड क्रमांक तिन मध्ये बिनधास्तपणे अवैधरित्या विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र बोर्डा येथे दिसून येत असुन गेल्या काही दिवसांपूर्वी एका नव्या व्यावसायिकाने अवैध देशी दारूचे खुलेआम दुकान मांडून बोर्डा गावात अवैध देशी दारूचा महापुर दिसून येत असुन पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे.
बोर्डा येथे वार्ड क्रमांक तिन मध्ये एका महिलेच्या घरातून देशी दारू विक्री व्यवसाय केला जात असून यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अवैध दारु विक्री बोकाळत चालला आहे. युवक रोजंदारीवर काम करणारा वर्ग या अवैध दारुच्या व्यसनात गुरफटत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहे.पोलिसांनी कठोर पावले उचलत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून बोर्डा येथे सुरू असलेली अवैध देशी दारू बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.