दिलासादायक
कोरोना अपडेट !
मारेगाव तालुक्यात केवळ ०९ तर शहरात ०२ पॉझिटीव्ह
- दोघांचा मृत्यू ,४० जन बरे होवुन घरी परतले.
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात कोरोनाचा कहर काहीसा सैल होतांनाचे संकेत आहे.मारेगाव तालुक्याला दिलासादायक देणारे वृत्त असे की,आज रविवार ला तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णात कमालीची घट होवून केवळ नऊ जन पॉझिटीव्ह आलेत यात मारेगाव येथील दोघांचा समावेश आहे.तालुक्यातील घोडदरा व खडकी येथील दोघांचा मात्र कोरोनाने मृत्यू झाला.
आज रविवारला प्राप्त अहवालात ४० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.कोरोनाने केवळ नऊ चा आकडा गाठत मारेगावात फक्त दोन पॉझिटीव्ह निघालेत.त्यामुळे तालुक्यासाठी ही दिलासादायक बातमी असली तरी तालुक्यातील घोडदरा येथील४८ तर खडकी बुरांड़ा येथील येथील ५० वर्षीय इसमाचा कोरोनाणे मृत्यू झाला.
परिणामी ,कोरोना संसर्ग दिवसागणिक मारेगाव तालुक्यावर मेहेरबान होतांनाचे चित्र आहे.मागील काही दिवसात वाढत्या कोरोना रूग्ण आकड्याने नागरीकात धडकी व भितीचे वातावरण निर्माण झाले होते.संचारबंदीने ब्रेक द चैन चा प्रयोग यशस्वी होत आज रविवार ला कोरोना रुग्णात कमालीची घट झाली आहे.नागरिकांनी नियम व अटीचे काटेकोर पालन केल्यास आगामी दिवसात या आकड्याचा भोपळा दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.