मारेगाव तालुक्यात आज ओसरला कोरोनाचा आकडा..
- मारेगाव तालुका ०३ ,शहर ०१ तर १४ झाले बरे.
मारेगाव : सचिन मेश्राम
कोरोना संसर्गाला मारेगाव तालुक्यात उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.आज प्राप्त अहवालात मागील अनेक दिवसाचे उच्चांक मोडीत तालुक्यात केवळ तीन पॉझिटीव्ह निघालेत.
मारेगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत कमालीची वाढ होतांना नागरिकांसह प्रशासनाची भितीयुक्त घाबरगुंडी उडाली होती.त्यामुळे सर्वत्र संचारबंदी करित ब्रेक द चैन ची मोहीम राबविण्यात आली.याचा सकारात्मक रिझल्ट मिळत या आकडेवारीने तुर्तास दिलासा दिला आहे.
मारेगाव तालुक्यात आज शनिवारला केवळ तीन जन बाधीत निघत मारेगाव शहरातील पॉझिटीव्ह चा आकडा केवळ एक वर थांबला आहे.चौदा जन बरे होत घरी परतले आहे.दिवसागणिक मिळत असलेल्या समाधान कारक आकडेवारींने मानवी मनाच्या धसक्याला उतरती कळा लागली आहे.