कोरोना अपडेट ...
मारेगाव तालुक्यात ५५ पॉझिटीव्ह
- मारेगावात १५ बाधीत
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोणा संसर्गाचा आलेख वाढत आज मंगळवारला प्राप्त अहवालात एकूण बाधितांचा आकडा ५५ वर गेला यात मारेगाव शहरातील १५ जनांना कवेत घेतले.
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस आपले पाय पसरत असतांना मारेगाव कोविड सेंटर वर संभाव्य रूग्ण तपासणीकरीता तोबा गर्दी करित आहे.तालुक्यात सर्वत्र फणफण सुरु असतांना आता ग्रामिण भागातील नागरिक तपासणी करुन घेत आहे.
आज मंगळवार ला तालुक्यातील आर.टी.पी.सी.आर. तपासणीत ३० तर रँपीड मध्ये २५ जन बाधीत होवून मारेगाव तालुक्यातील पॉझिटीव्ह आकडा ५५ वर गेला.यात प्रामुख्याने मारेगाव शहरातील बाधितांचा आकडा १५ वर आहे.उर्वरित आकडेवारीत कुंभा,चिंचमंडळ,कोसारा,गाडेगाव,
पाथरी,बोटोणी,जळका,नरसाळा येथील गावांचा समावेश आहे.