पांढरकवडा शहरातील रामदेव बाबा लेआउट मध्ये विद्युत इलेक्ट्रिक पोल बसवण्यात यावा या मागणीसाठी कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी:पांढरकवडा
योगेश देठे
रामदेव बाबा नगरी पांढरकवडा येथील रहिवाशी माजी नगरसेवक अंकित नैताम यांच्या नेतृत्वाखाली रामदेव बाबा नगरी या वस्तीत विद्युत खांब बसविण्याबाबत निवेदन कार्यकारी अभियंता वैद्य साहेब महावितरण विभागीय कार्यालय पांढरकवडा यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष लेखी निवेदन दिले आहे.
रामदेव बाबा नगरी ही वस्ती जवळजवळ मागील दहा वर्षापासून येथे वास्तव्य करीत पासून सदर भागात अपुरे विद्युत खांब आहेत एका विद्युत खांबावर २० ते २५ घरांची घरगुती विद्युत वायर यांची जोडणी प्रत्येक घराला ४०० ते ५००फूट ही बाब आर्थिकदृष्ट्या न परवडणारे व गैरसोयीचे आहे यामुळे विद्युत वाहिनीवर प्रचंड ताण येऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होते परिणामी यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल असल्याने याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊन डेंगू मलेरिया सारख्या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत असलेल्यमुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य ही बिघडत असल्याने वस्तीतील नागरिक आर्थिकही अडचणीत आला असून ही बाब एकंदरीत चिंताजनक आहे यापूर्वीही अनेकदा तोंडी व लेखी निवेदन महावितरण विभागीय कार्यालय पांढरकवडा व नगरपालिका पांढरकवडा यांना देवून सुध्दा याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात असल्याने दि ३मे रोजी कार्यकारी अभियंता वैद्य यांना निवेदन देवून विद्युत खांब लवकरात लवकर बसून देण्याची मागणी करण्यात आली होती कार्यकारी अभियंता यांनी आश्वासन दिले हे काम आता होईल अशी आशा वाटते रामदेव बाबा नगरिया परिसरात अनेक मूलभूत सोयी उपलब्ध नाही ना रस्ते पिण्याचे पाणी सांडपाण्याची गटारे ना पत्र दिले अशा मूलभूत सोयी व सुविधांचा अभाव आहे नगरपालिका पांढरकवडा यांच्याकडूनही या प्राथमिक गरजांची अजून पावेतो पूर्तता करण्यात आले नाही यामुळे रामदेव बाबा नगरी येथील नागरिकांमध्ये याविषयी प्रचंड संताप असून या प्राथमिक मूलभूत स्वयं कडे शासन कधी लक्ष देणार आहेत हा प्रश्न सतत रामदेव बाबा येथील नागरिकांच्या मनात आहे नगरपालिका याकडे लक्ष देतील का असा प्रश्न माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केला आहे विकासाचे काम नको अशीच मानसिकता आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे गेल्या १० वर्षापासून तोंडी व लेखी विनंती अर्ज करूनही हे प्रश्न सुटणार नसतील तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती रामदेव बाबा लेआउट मधील नागरिक मधु पाटील आलूवार दिले आहे