मजरा येथे ७१ नागरीकांनी केली कोरोना तपासणी १० नागरिकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह
पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील मजरा येथील शनिवार दि. ८मे रोजी कोरोना तपासणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरा येथे तपासणी घेण्यात आली होती यामध्ये ६१ नागरिक निगेटिव आले तर १० नागरिकांना कोरोना लक्षणे अँटीजेन रॅपिड तपासणी मध्ये आढळून आले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता मारेगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढत चाललेली संख्या तसेच या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मारेगाव आरोग्य विभागाच्या वतीने मजरा येथे अँटीजेन कीट च्या साह्याने रॅपिड टेस्ट घेण्यात आली. ऐकून ७१ लोकांचे ऑक्सिजन लेव्हल मोजून त्यात ज्यांच्यात थोडीफार लक्षणांची शंका दिसली आश्या ७१ नागरिकांचे स्वाब घेऊन अँटीजेन किटच्या साह्याने तपासणी केली. यात ७१पैकी १० नागरिकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले तर ६१ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या १०लोकांना मारेगाव कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.
या अँटीजेन रॅपिड तपासणी साठी नागरीकांनी स्वतः पुढे येऊन आपली कोरोना आजारा विषक चाचणी करून घेतली.या वेळी मजरा येथील तलाठी जे.आर.शेख, निलेश मस्से ग्रामसेवक, सौ,शोभा बोबडे सरपंच्या, जयराम नागपुरे पोलीस पाटील, सुरेश. येरमे कोतवाल,कुसुम आत्राम आरोग्य सेविका, रुक्माई उईके आशा सेविका यांच्या सहकार्याने मजरा येथील कोरोना शिबीर यशस्वी करण्यात आले.