डॉ. शाह कोविड हॉस्पिटलमध्ये तोडफोड मृतदेह बदलल्याने तोडफोड
मारेगाव वार्ता
रोहन आदेवार- यवतमाळ : कोरोनाबाधित वडीलाचा मृतदेह सोपविताना अदलाबदल झाल्याने संतप्त नातेवाईकांनी यवतमाळच्या येथील डॉ शाह हॉस्पिटल मध्ये तोडफोड केली. आज दुपारी एक वाजताचे सुमारास ही घटना घडली.
मृतदेह बंद केलेल्या कपड्यांमध्ये असलेला एक मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. नातेवाईकांनी कपड्यात असलेलामृतदेह उघडून बघितले असता आत दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात आल्याने मृताचे नातेवाईक मृतदेह मोक्षधामात तसाच सोडून रुग्णालयात दाखल झाले आणि संताप नातेवाईकांनी डॉक्टर शाह रुग्णालय घाटून रुग्णालयाची प्रचंड तोडफोड सुरु केली.