मारेगाव व राळेगाव तालुक्याला जोडणारा रस्ता मोजतोय अखेरची घटका
रस्ता दुरुस्तीनंतर अवघ्या १५ ते २० दिवसातच उखडली खडी
रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ: मारेगाव तालुक्यातील नरसाळा ते राळेगाव तालुक्यातील खैरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून रस्तात खड्डे की खड्यात रस्ते हे समजेनासे झाले आहे.
नरसाळा-कुंभा ते खैरी रस्ता अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनेक वेळा मागणी तसेच युवासेना मारेगाव कडून निवेदनही देण्यात आले होते. या रस्त्या संदर्भात बातमी विविध वृत्तपत्रे तसेच न्यूज पोर्टल यांनी प्रकाशित केली होती. ती बातमी प्रकाशित होताच त्यानंतर रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे खडी व डांबर टाकुन काम डिसेंम्बर महिनात सुरू झाले. मात्र रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने १५ ते २० दिवसातच रस्त्यावरील खडी उखडल्याचे चित्र दिसुन आले आहे. या रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे व त्यात रस्त्यावर खड्डे तर कुठे खडी निघाल्याने वाहन पंचर होण्याच्या प्रमाणात व अपघात होण्यात वाढ झाली आहे. तर वाहनचालकांना रस्तावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुचाकी चालवताना रोजच दुचाकीस्वराचा अपघात होत असून संबंधित अधिकारी यांनी रस्ताची पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिका कडुन होत आहे.