हिवरा (मजरा)येथील शेतकऱ्याची आत्महत्या
प्रतिनिधी/पंकज नेहारे
तालुक्यातील हिवरा (मजरा)येथील शेतकऱ्याने कीटकनाशक द्रव्य प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.२६ मे रोजी घडली.
पुरूषोत्तम सिताराम गाडगे अंदाजे वय वर्षे ५९ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या चे नाव असुन दि.२६ मे रोजी स्वत:चे घरामध्ये कीटकनाशक द्रव्य प्राशन केले.पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असता २९ मे रोजी दुपारी तिन वाजताच्या दरम्यान उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला.तुर्तास आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.असुन पुरूषोत्तम यांच्या पाठी मागे पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे