शेतकऱ्याचे रोहित्रामुळे जिव धोक्यात
उमरी विद्युत विभागाचे दुर्लक्ष
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
योगेश देठे
पांढरकवडा : पांढरकवडा उपविभागीय विद्युत विभागा अंतर्गत येते असलेल्या सुरदेव कोठोडा,व अडणी या तिन गावातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी विद्युत रोहित्र (डिपी) लावलेले असुन त्या रोहित्रा मधून आईल निघत असून पॅनल बोर्ड मध्ये ग्रीपच्या जागेचे पॉईंट गंजून जिर्ण झाले असुन ते कधीही निघू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच इतर जनावरांना जिवाला धोका निर्माण होवू शकतो.
हे विद्युत रोहित्र ज्या खांबावर बसविले आहे त्या खांबाना आणि रोहित्राला आधार देणारे दोन मुख्य लोखंडी खांब(पोल) पुर्णपणे गंजून जिर्ण झाले आहेत. तसेच गंजल्यामुळे खांबांना होल पडले आहेत. याच खांबांवर मोठ्या विद्युत वाहिन्या देखिल जोडल्या आहेत. परिणामी हा खांब कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजवितरण विभागाने जर वेळीच कुठली दखल घेतली गेली नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते.त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर हे धोकादायक रोहित्र(डिपी)व खांब नवीन देण्याची मागणी होत असुन गेल्या अनेक वर्षापासून निवेदन देवून सुध्दा विजवितरण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असुन एकदी जीवित हानी झालेल्यावरच लक्ष देईल का असा संताप सवाल शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे.