करनवाडी येथील युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
मारेगाव : पंकज नेहारे
अल्पवयीन मुलीला भ्रमणध्वनी वरून मँसेज करुन पाठलाग करणे व प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधने या गुन्ह्या अंतर्गत करनवाडी येथील युवकावर गुन्हा दाखल करुन मारेगाव पोलिस स्टेशन मध्ये अटक करण्यात आली आहे.
करनवाडी येथील सुरज उर्फ आकाश संजय गायकवाड (२३)असे संशायित आरोपीचे नाव असुन येथीलच पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भ्रमणध्वनी वर सातत्याने मँसेज करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.नव्हेतर तिच्या सोबत जवळीकता साधून गैरव्यवहार केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या आईने मारेगाव पोलिसात दाखल केली.
त्यानूसार संशायित आरोपीचे विरोधात कलम ३५४ आय.पी.सी.१२( पोक्सो )अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.सदर प्रकरणाचा तपास उपनिरिक्षक अमोल चौधरी करित आहे.