शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लाखो रुपयाचे नुकसान
म्हैसदोडका येथील घटना
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी/सुधाकर मेश्राम
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील शेतकऱ्याच्या घरा शेजारी असलेल्या कोठ्याला सायंकाळच्या दरम्यान०२.३०मिनिटांनी कोठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. कोठ्या शेजारी राहत असलेली महिला झोपेतून शौचालयसाठी उठली असता त्या महिलेचे लक्ष गेले की हिरालाल घागी यांच्या कोठ्याला आग लागली महिलेने आपल्या पती यांना उठून घरा शेजारी असलेल्या नागरिकांना उठून कोठ्याला आग लागली असल्याचे सांगितले नागरिकांनी कोठ्याकडे धाव घेत तो तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते.
नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा मारा केला असता काही प्रमाणात आग आटोक्यात आली. हिरालाल घागी या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे बैलांचा चारा जळून खाक झाला असून कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने झालेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी हिरालाल घागी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे