" दिलासादायक स्टोरी "
कोरोनावर ' खबरदारी ' हेच खरे ..घरीच उपचार घेत अख्खे कुटुंब झाले बरे!
- मारेगावात कोरोनावर मात करण्यास एकजूटता,कुटुंबाचा आधार व सकारात्मक विचार ठरले गमक
'एल्गार' एक्सक्लुझिव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील वास्तव्यात असणारे दीपक शेंडे यांच्या पाच जणांच्या कुटुंबियाने घरातच योग्य उपचार घेत कोरोना संसर्गजन्य रोगावर सपशेल मात केली.विशेष म्हणजे साठी ओलांडलेली मातोश्री घरात असतांना पाच जनांचे कुटुंब कोरोना बाधीत झाले. घरीच उपचार घेत कोरोनामुक्त झाल्याने विहीत वेळेत योग्य उपचार व सकारात्मक दृष्ठीकोण ठेवून घरात राहुनही कोरोना संसर्गाला हरविता येते हे मारेगावात अधोरेखीत झाले.
कोरोना पॉझिटीव्ह समजताच अनेकांची भितीदायक भंबेरी उडत मनातील कालवाकालव होते.मानसिक तणाव सह असंवेदनशिलता वाढत नजिकच्या दवाखाण्याची शोधाशोध करित असल्याचे उदाहरने अलिकडच्या कोरोना प्रकोपाने सर्वत्र दिसते आहे.अशावेळी योग्य डॉक्टरचा सल्ला घेवुन सर्व निर्बंध आणि उपचाराचे काटेकोर पालन केल्यास घरीच उपचार घेणे अशक्यप्राय नाही.हे शेंडे यांच्या उदाहरणातुन दिसुन येत आहे.यांच्या कुटुंबात प्रारंभी सर्दी व ताप ही लक्षणे दिसुन आलेत.त्यानंतर कुटुंब प्रमुख दीपक शेंडे यांना कोरोना संसर्गाची शंका आल्यागत सर्वप्रथम मारेगाव येथील कोविड सेंटर मध्ये तपासणी केली असता ते पॉझिटीव्ह आले.त्यानंतर कुटुंबातील सर्वांची तपासणी करुन सर्वांचा अहवाल बाधीत आला.तात्काळ सर्वांनी यवतमाळ गाठुण सिटीस्कँन केले.
सर्वांनी डॉक्टरांचा सल्ला घेवुन घरीच राहत योग्य उपचार घेतले.बरे होईल हा सकारात्मक दृढनिश्चय करित गृहविलगिकरणात राहुन वापरले जाणारे प्रसाधन गृह व वेगवेगळ्या खोल्या सँनिटाईझ केल्यात. घरबसल्या या सर्व सकारात्मक विचाराने व विश्वासाने प्रकृतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत हे पाच जनांचे कुटुंब आता कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना संसर्गावर विहीत वेळेत योग्य खबरदारी ,उपचार ,सकारात्मक दृष्ठीकोण व कुटुंबाचा आधार हेच गमक ठरले खरे आणि गृहविलगिकरनातील उपचाराने अख्ख कुटुंब झाले बरे हे मात्र तेवढेच खरे!