Type Here to Get Search Results !

कळंब शहरात वाघमारे कपडा दुकानदाराला ठोकला ५० हजार रुपयाचा दंड. कळंब

कळंब शहरात वाघमारे कपडा दुकानदाराला ठोकला ५० हजार रुपयाचा दंड.

 कळंब पोलीस निरीक्षकांची शहराता धडाकेबाज मोहीम सुरू. 

           मारेगाव वार्ता
जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार

कळंब (यवतमाळ) कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेशावरून दि. ९ मे २०२१ पासुन शहरात कडक लाॅकडाउन करण्यात आले असल्याने दि. १० मे २०२०. रोजी इंदिरा चौका मधिल वाघमारे कापड दुकानदार यांचे राहते घरी दुपारी ११ वाजता सुमारास पोलीस निरीक्षक अजित राठोड यांच्यासह कोरोना पथकाने धाड मारुन ५० हजार रुपयाचा दंड ठोकून दुकान सिल केल्याची घटना घडली. 
 प्राप्त माहिती नुसार कोरोना विषाणूच्या काळात 
जीवनावश्यक वस्तूंच्याच दुकान उघडण्याला शासनाने परवानगी दिली असुनभ्य इतर अनावश्यक दुकाने शासनाचा आदेश असे पर्यंत उघडण्यास बंदी घातली आहे.  त्यामुळे हातावर पोट असणारे चिल्लर दुकानदार अडचणीत आले असुन त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र शासनाची परवानगी नसल्याने हातावर हात ठेवून बसुन असुन ज्यांचे कडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. अशाच व्यावसायिकांना जास्तची हाव असल्याने दररोज तहसीलदार डाॅ. सुनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय आकोलकर, नगरपंचायत अधिकारी मगर, तसेच पंचायत समितीचे शिक्षक, नगरपंचायत कर्मचारी, महसुल कर्मचारी, पोलीस कर्मचारी इत्यादी कर्मचाऱ्यांचे पथक शहरात सकाळी ७ वाजता पासुन दुपारी ११ वाजेपर्यंत शहरातील बसस्थांनक परिसरात, सर्व चौकांमध्ये फिरुन जीवनावश्यक उघड्या असलेल्या दुकानदारांवर जाऊन कोरोना टेस्टींग न करणाऱ्या,ग्राहकांची गर्दी वाढविणाऱ्या, रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यां, वाहन चालकां जवळ लायसन्स नसने, कोरोना टेस्टींग न केलेल्या, नागरीकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे यातुनच दि ९ मे रोजी ८० वाहन चालकांवर पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी दंडात्मक कारवाई करुन १६००० रुपयाच्या पावतीस निरीक्षक अजित राठोड यांनी दंडात्मक कारवाई करुन १६००० रुपयाच्या पावती फाडल्या तर दि.  १० मे रोजी मार्केटमधील सर्व दुकानांवर पोलीस निरीक्षक. अजिज राठोड व त्यांच्या पथकाने भेटी देत इंदिरा चौकामध्ये आले असता वाघमारे साडी सेंटरवर वाल्याच्या घराजवळ गर्दी दिसल्याने जाऊन पहाणी केली असता घरामध्ये ग्राहक करणे सुरु असल्याचे दिसल्याने पोलीस निरीक्षक अजित राठोड यांचे मार्गदर्शनाखाली नगरपंचायत अधिकारी मगर व ईतर कर्मचाऱ्यांनी सोळा ग्राहकांकडून प्रत्येकी. ५०० रुपये प्रमाणे ८ हजार रुपये व कापड दुकान सुरु ठेवून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी ५० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी सांगितले सदर. कारवाई कल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies