मारेगाव तालुक्यातील गावागावामध्ये गृहविलगीकरण कक्ष स्थापन करा, उपसभापती संजय आवारी यांची जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून केली मागणी
मारेगाव वार्ता/ जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
मारेगाव: तालुक्यामध्ये दिवंसोदिवस गावामध्ये कोरोणा रुग्ण अतिशय मोठया प्रमाणात आढळुन येत आहे रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आल्यानतंर त्यामध्ये सौम्य लक्षणे असल्यास त्यास गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात येते पंरतु गावामध्ये नागरिकाच्या घरामध्ये एकच शौचालय असल्यामुळे तसेच गृहविलगीकरणासाठी पाहिजे असलेल्या स्वतंत्र खोलीची व्यवस्था नसल्यामुळे घरातील दुसऱ्या व्यक्तीस कोरोनाचा ससंर्ग होण्याचा धोका निर्माण होवू शकतो व काही गावामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
त्यामुळे या पत्राव्दारे जिल्ह्याधिकारी यांना मागणी करण्यात आली कि मागील वर्षीप्रमाणे गावातील ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातुन गावामध्ये असलेली प्राथमिक शाळा,समाज मंदीर,ग्रा.प.भवन यामध्ये गृहविलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे तसे केल्यास इतरांना संसर्ग होणार नाही. व रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नाही अशी मागणी उपसभापती व शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी यांनी दिलेल्या पत्रातून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मागणी केली आहे.