मार्डी पॉईंटवर वणी वाहतूक पोलिसांची दादागिरी
वरिष्ठाकडे केली तक्रार
मारेगाव पोलिस स्टेशन समोरील मार्डी चौक नजिक नाकाबंदी पॉईंटवर असुन वणी येथून मार्डी चौकात आपले कर्तव्य बजावण्यासाठी मार्डी चौक येते नेहमीच दोन वाहतूक पोलीस सांच्या ड्युटी लावली जात असुन त्यातील एका वाहतूक पोलीसाची
दादागिरी व वसुलीचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रति रोष व्यक्त होत आहे असे असताना वरिष्ठ पोलिसाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत आहे . याबाबत काही सुजाण नागरिकांनी वरिष्ठा कडे या सर्व गंभीर प्रकारची तक्रार दिली असून .
सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याकरिता कडक लॉकडाहून लागू करण्यात आले आहे. त्या पाश्वभूमीवर मारेगाव पोलिस स्टेशन समोर मार्डी चौकात नाकेबंदी पॉईंट साठी पोलीस व पोलीस शिपाई इतर कर्मचारी यांची पाँईवर ड्युटी लावण्यात आली आहे .या महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे .मात्र तपासणी करताना वणी वाहतूक नियंत्रण शाखेचे दोन त्या मधील एक कर्मचारी मन मर्जीप्रमाणे अडेल धोरण अवलंबित नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. जा वाहनांना पूर्ण बंदी आहे अशा वाहन चालकाकडून लक्ष्मी मिळाल्यास त्या वाहनधारकांना २४ तासात करिता मोकळी सूट दिली जात आहे .मनमानेल पद्धतीने हे शिपाई खाकीचा धाक दाखवीत वसुलीचे टारगेट पूर्ण करीत आहे .एवढा सारा गंभीर प्रकार होत असताना वरिष्ठाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे आहे .
दोन दिवसापूर्वी याच पॉईंटवर एका टोळीने चांगलीच धुमाकूळ माजविला होता. यावेळी नको त्या भाषेचा वापर करीत पोलिसाप्रती चांगले तोंडसुख घेतले होते. यावेळी उपस्थित शहरातील नागरिकाना पोलिसांचा होणारा अपमान पाहता मुंगी गिळून गप्प बसावे लागले होते.त्यामुळे दादागिरी व वसुली पोलिसांना वरिष्ठ अधिकारी यांनी जागा दाखवावी अशी मागणी होत आहे