करंजी ग्रामीण हॉस्पिटलला ऑक्सिजन काँन्सन्ट्रटर भेट
प्रतिनिधी/ योगेश देठे
पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात राळेगाव विधानसभा विद्यमान आमदार प्राध्यापक अशोक उईके यांनी आँक्सिजन काँन्सन्टेटर भेट दिले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने रुग्णांना उपचार मिळावा रूण्याची गैरसोय होऊ नये म्हणून
विद्यामान आमदार डॉ.अशोक उईके आँक्सिजन काँन्सन्टेटर भेट दिले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश दुर्ग यांच्या सोबत रूग्णालयाची पाहणी केली व रूग्णालयात असलेल्या रुग्णांना तब्येतीची विचार पूस केली. यावेळी उपस्थित आमदार डॉ. अशोक उईके, माजी शिवसेना तालुका प्रमुख(पांढरकवडा)कडकुरिवार करंजी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच्या सौ. मिना रामपुरे,उपसरपंच प्रफुल नगराळे, माजी सरपंच ,भिमराव आत्राम किशोर आडे,संजय कुंडलावार ,सचिन मडावी सुरेश रामपुरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.