कोरोना अपडेट ...
मारेगाव तालुक्यात ८१ तर मारेगावात १५ बाधीत
- बरे झालेले रूग्ण ५४
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणुने पुन्हा आपला आकडा फुगवित आज रविवार ला ८१ वर मजल मारली यात मारेगाव शहरात १५ जनांना बाधीत करित सतर्कता बाळगण्याचा पुन्हा गर्भित इशारा दिला आहे.किंबहुना तालुक्यातील दिलासादायक वृत्त असे की ,मागील दहा दिवसाच्या रुग्णात कमालीची घट होत किमान ५४ जन बरे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यात आज पर्यन्त शेकडोंना बाधीत करीत कोरोनाने आपला मनसुबा कायम ठेवला.यातील दिलासादायक म्हणजे मागील दहा दिवसातील किमान ५४ जन बरे होवून घरी परतले आहे.यात काही मारेगावसह ग्रामिण भागातील नागरिक आहे.बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असले तरी रोजच्या पॉझिटीव्ह आकड्याची जंबो भरती होत आहे.ही चिंतेची बाब असली तरी शासनाने ठरविलेलया लॉकडाऊन व संचारबंदीने आगामी दिवसात ही आकडेवारी वजाबाकीत दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज रविवार ला प्राप्त अहवालात आर.टी.पी.सी.आर.चे ३८ व रँपिड ४३ असे एकूण ८१ जण पॉझिटीव्ह निघालेत.मारेगाव शहरातील १५ असुन मागील दहा दिवसातील ५४ रूग्ण बरे झाले आहे.हा सकारात्मक आकडा व वाढत्या आकडेवारीला लगाम घालण्यासाठी नागरिकांनी शासनाने ठरविलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.