नरसाळा ग्रामपंचायत, महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्तपणे जनजागृती करून कोविड १९ तपासणी शिबीर संपन्न
----------------------------
प्रतिनिधी अनंतराव गोवर्धन
मारेगाव तालुक्यातील अज्ञात वायरसने थैमान घातले असून घरोघरी बिमारीचे प्रमाण दिवसा गणित वाढतच चालले आहे. परंतु आजाराची माहिती सर्वसामान्य जनतेला समजने कठीण झाले होते. या वायरस कोणता असेल की कोरोनाच असेल अशी नरसाळा येथील नागरीकांना भीती वाटत असल्याने नरसाळा नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहवयास मिळत होते.
या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नरसाळा येथील ग्रामपंचायतील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रविचंद्र जनबंधू यांना माहिती ग्रामपंचायत सदस्या कडून मिळताच ग्रामसेवक यांनी संबंधित प्रशासनाला व महसूल विभाग, गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून नरसाळा येथील नागरिका मधली भीती दुर करण्यासाठी
रविवार दि.०९मे रोजीला नरसाळा येथील जनजागृती फेरी काढुन कोविड १९ तपासणी शिबीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये घेण्यात आले. या शिबिरात अँटीजेन तपासणी ९५ व आर. टी. पी. सी. आर.५४ एकूण १४९ अँटीजेन मध्ये पाँझटिव्ह २अशी माहिती तपासणी अधिकारी यांच्याकडून मिळाली आहेत.
या कार्यक्रमाला नरसाळा येथील सरपंच संगीत मरस्कोल्हे, उपसरपंच यादवराव पांडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे. प्रयोग शाळा तंत्रज्ञ् सुजाता चोपणे, औषध निर्माण अधिकारी विशाल राठोड, व्ही. एच. थिटे तलाठी, रविचंद्र जणबंधू ग्रामसेवक, एस. एस. कोलूरी आरोग्य सेवक आशा सेविका सौं. जयश्री भुसारी, मीनाबाई राऊत, अंगणवाडी सेविका भरती खाडे, सविता गोवर्धन अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ केशव उईके, कोतवाल संदीप कुळसंगे गिता कुळमेथे, व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी इत्यादी या कोविड तपासणी शिबिरात उपस्थित होते.