मारेगावात ७ तर तालुक्यात ४२ पॉझिटीव्ह
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात आज गुरुवार ला पुन्हा कोरोनाने बाधीत आकडा फुगवीत ४२ वर नेला.मारेगाव शहरातील आकड्याचा ओघ ओसरत केवळ सात वर आहे.
मारेगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.दररोज च्या तुलनेत मारेगाव शहरातील आजचा आकडा एकेरी आहे.त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला मात्र तालुक्यातील आकडा फुगत असल्याने चिंतेचे सावट कायम आहे.
दरम्यान आज प्राप्त अहवालात मारेगाव तालुक्यातील पॉझिटीव्ह ची संख्या ४२ आहे तर मारेगाव शहरात सात जन बाधीत आहे.