माजी सरपंच रविंद्र जवळकर व सचिव ए.बी.राठोड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
दाभा येथील ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार
बाभूळगाव दि.१३ मे -:येथील दाभा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ऑनलाईन ई-मेल द्वारा निवेदन देऊन केली सखोल चौकशी मागणी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेब यांनी काढलेला आदेश क्रमांक/गृहशाखा/डेक्स १२/कावि/५१७ दिनांक ७ मे २०२१ चा जीआर मधील मुद्दा क्रमांक ७ या अंतर्गत लॉकडाउन असल्यामुळे आम्ही आपणास प्रत्यक्ष निवेदन न देता आल्या मुळे निवेदन ऑनलाईन ई-मेल पद्धतीनं ग्रामस्थांन कडून देण्यात आले आहे. समस्त गावकरी दाभा ग्रामपंचायत येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षापासून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे.या सर्व प्रकाराला तत्कालीन सरपंच रविंद्र जवळकर तसेच ग्रामविकास अधिकारी ए.बी.राठोड हे जबाबदार असून यांनी केलेल्या संपूर्ण योजनेअंतर्गत केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी.
महिला व बालकल्याण,किरकोळ इतर काम,नव्याने झालेली कर्मचारी पदभरती,आरोग्य,शिक्षण,उपजीविका,अपंगा करिता व्हील चेअर,ग्रामपंचायत मध्ये फोगिंग मशीन खरेदी करणे,किशोरवयीन मुलींना पोषण आहार पुरविणे, जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे, जिल्हा परिषद शाळेत आरो फिल्टर बसविणे,वार्ड क्र.२ मधील २०१९ ते २०२० च्या कालावधीत नव्याने तयार झालेल्या सिंमेट रोड,ग्रामपंचायत इमारत दुरस्ती,गावातील सर्व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे माती परीक्षण करणे,गावातील शेतकरी शेती संलग्न व्यवसाय करण्यासाठी अभ्यास दौरा करणे,अंगणवाडीमध्ये विद्युत जोडणी करणे,मागासवर्गीय वस्ती पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे,मागासवर्गीय वस्ती मध्ये एलईडी लाईट लावणे यासह अनेक योजने अंतर्गत होणाऱ्या शासकीय कामात करोडोंचा भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षांमध्ये करण्यात आला असल्याने या ग्रामपंचायत मधील गेल्या पाच वर्षाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करावे ही दाभा या गावातील संपूर्ण नागरिकांची मागणी असून संबंधित दोषीवर कारवाई न झाल्यास आम्ही समस्त गावकरी जिल्हा अधिकारी कार्यालय समोरच आमरण उपोषण करू याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी या निवेदनमध्ये मागणी केली आहे.समस्त गावकरी जिल्हा अधिकारी कार्यालय समोरच आमरण उपोषण करू याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी या निवेदनमध्ये मागणी केली आहे.