मारेगाव तालुक्यात केवळ एक पॉझिटीव्ह
- एका महिलेचा मृत्यू
- ६४ जन झाले बरे
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात कोरोना संसर्ग उसंत घेण्याच्या मुड मध्ये आजच्या आकडेवारी वरुण दिसते आहे.आज प्राप्त माहिती नुसार मारेगाव तालुक्यात केवळ एक जन पॉझिटीव्हची नोंद झाली.मात्र नेत येथील ५२ वर्षीय महिलेचा आज शुक्रवारला कोरोनाने मृत्यू झाला.
मारेगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गात शिथिलता दिसते आहे.
ब्रेक द चैन मुळे कडक लॉकडाऊण व संचारबंदीचा परिपाक समजल्या जात असतांना आज शुक्रवार रोजी रँपिड चे २४ तर ५६ जनांनी आरटी- पीसीआर ची तपासणी केली.यात रँपीड तपासणीत केवळ एक जन पॉझिटीव्ह निघाला त्यामुळे नागरिकां सह प्रशासनास दिलासा मिळतो आहे.आरटी- पीसीआर चे नमुने यवतमाळ प्रयोग शाळेत पाठविल्याने त्याचा अहवाल उद्या प्राप्त होईल.
दरम्यान आज बरे झालेल्या रुग्णात ६४ या जंबो आकड्याची नोंद झाली. यातील सर्वांना घरी पाठविण्यात आले.तालुक्यातील नेत येथील मागील अकरा दिवसा पासुन होम आयसोलेशंन मध्ये असलेल्या ५२ वर्षीय महिला कोरोनाच्या बळी ठरल्या.