संभाजी महाराज जयंती निमित्य रक्तदान संपन्न
आशाताई बोढे यांना शिवांजली अर्पन
मारेगाव:पंकज नेहारे
छ.संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुका शाखा संभाजी ब्रिगेडच्या विद्यमाने नगरपंचायत भवन मारेगाव येथे रक्तदान संपन्न झाले , प्रथम छ.संभाजी महाराजाच्या प्रतिमेश अभिवादन करून रक्तदान शिबीराला सुरुवात झाला , कोरोना प्रादुर्भावात मोजक्याच रक्तदात्यानी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले, लाईफलाईन ब्लड बँक नागपूरच्या वतीने रक्तदात्याच रक्त संकलन करण्यात आले,
यावेळी कोरोना आजारात बळी पडलल्या मराठा सेवा संघ परिवारातील आशाताई अनामिक बोढे यांना शिवाजली अर्पन करण्यात आली, यावेळी मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष ज्योतीबा पोटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, माजी अध्यक्ष अनामिक बोढे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष लहु जिवतोडे, कुंदन पारखी, प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, किशोर जुनगरी हे उपस्थित होते.