मारेगावचे हार्डवेअरला ५० हजाराचा दंड, प्रतिष्ठांन सील
- कायद्याच्या उल्लघनाचा परिपाक
- मारेगाव प्रशासनाची कारवाई
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव शहरातील राज्य महामार्गावर असलेल्या गोरंटीवार हार्डवेअर प्रतीष्ठाण लॉकडाऊन मध्ये व्यापार करित असतांना मारेगाव प्रशासनाने छापा टाकुन हार्डवेअर सील करित ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला.या कारवाईने शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकात जबर धडकी बसली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असतांना शासनाने लॉकडाऊन सह संचारबंदीचे कडक निर्बंध लावले आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यावर भर देत कोरोनाची चैन सैल करण्याचा प्रयत्न होत असतांना मारेगाव येथील पोलिस प्रशासन ,नगरपंचायत व तहसिल प्रशासन तगडा बंदोबस्त व काटेकोर नियमा करिता कायम सज्ज आहे.
अशातच मारेगाव येथील दवाखाने व मेडिकल ला मुभा देण्यात आली असतांना मारेगाव येथील डॉ.आंबेडकर पुतळ्या समोरील सचिन गोरंटीवार संचालक असलेल्या गोरंटीवार हार्डवेअर हे प्रतिष्ठान सताड उघडे ठेवीत व्यवसाय करित होते. आज सोमवारला सकाळी नऊ वाजताचे दरम्यान अत्यावश्यक सेवा व्यतिरीक्त आस्थापना सुरु असल्याची सबब दाखवित शासनाच्या आदेशाची पायमल्ली करित असल्याने हे प्रतिष्ठान सील केले व ५० हजार रुपयाचा दंड ठोठाविला.ही कारवाई ठाणेदार जगदीश मंडलवार , उपनिरीक्षक अमोल चौधरी ,महसूल विभागाचे संतोष राठोड ,नगरपंचायतचे निखिल चव्हाण यांनी केली. लॉकडाऊनच्या काळात बहुदा मारेगाव येथील ही प्रथम व मोठी कारवाई असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या काटेकोर नियमांची पायमल्ली करणाऱ्याचे धाबे मात्र कमालीचे दणाणले आहे.