Type Here to Get Search Results !

बोर्डा येथील युवा सरपंच प्रविण मडावी यांचे निधन

बोर्डा येथील युवा सरपंच प्रविण मडावी यांचे निधन
- हळद सुकन्यापुर्वीच अवघ्या सोळा दिवसात मोडला कोरोनाने संसाराचा डाव
   मारेगाव : सचिन मेश्राम 
         संसाराचे स्वप्न रंगवीत असतांना कोरोनाची करडी नजर त्याच्या आयुष्यावर पडली.सोळा दिवसापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या आपल्या अर्धांगिणी सोबत जीवनाला प्रारंभ करणाऱ्या बोर्डा येथील युवा सरपंच प्रविण अनंतराव  मडावी (२९) यांना कोरोनाने कवेत घेत कुटुंबावर आघात केल्याची दुर्देवी घटना घडली.या अकाली घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
     बोर्डा येथील ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूकीत येथील सरपंच पद अनु.जमाती पुरुष प्रवर्गा करिता राखीव होते.थेट जनतेमधुन झालेल्या निवडणूकीत हजारो मताधिक्क्याने प्रविण यांनी दणदणीत विजय संपादन केला होता.गाव विकासावर भर देत विविध लोकाभिमूक योजना प्रविण यांनी अवघ्या दोन वर्षात कार्यान्वित केल्या होत्या.त्यामुळे ग्राम पातळीवर व जनसामान्यात हरहुन्नरी सरपंच म्हणून त्याची ओळख झाली होती.
     आयुष्याला हातभार लावण्यासाठी  जोडीदार म्हणून मारेगाव तालुक्यातील  घोडदरा  येथील कन्ये सोबत तो विवाह बंधनात अडकला.संसाराची चाके जीवनाच्या रुळावर येत असतांना नियतीने डाव साधला.विवाहानंतर अवघ्या दहा दिवसात कोरोना संसर्गाने त्यास कवेत घेतले.यवतमाळ येथे उपचार घेत असतांना नवागत धर्मपत्नी सोबत भ्रमनध्वनी द्वारे संभाषणात प्रकृती ठीक झाली.येत्या दोन दिवसातच मी गावाला येणार असल्याचे सांगत पत्नी सोबत हितगुज केले.मात्र सुखी संसाराची आलबेल नियतीला मान्य नव्हती.आणि लगेच दुसऱ्या दिवशी नको असणारा निरोप कुटुंबाला आला आणि मडावी कुटुंबावर आघात पडला .संसारात रमबाण झालेल्या नवख्या सुखी संसारावर नियतीने डाव साधल्याने अंगावरील हळद सुकन्यापुर्वीच वेदनादायक दु: ख वाट्याला आल्याने बोर्डा व घोडदरा येथे हळहळ व्यक्त होत आहे.मृतक प्रविण यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies