मालेगाव तालुका अध्यक्ष पदी शरद जाधव यांची निवड, बिरसा क्रांती दल तालुका शाखा मालेगाव जाहीर
मारेगाव वार्ता
मालेगाव:प्रतिनिधी
मालेगाव: शरद दादाजी जाधव यांची बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्ष मालेगाव पदी निवड करण्यात आली आहे. मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत तालुका शाखा मालेगाव जिल्हा नाशिकची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शरद जाधव हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे शिक्षण बी.ए.बी .एड. इतके झालेले आहे. राजलगांव ग्रामपंचायतचे ते विद्यमान सदस्य आहेत.हिरो मोटो कोरप्पेशन लिमिटेड. मध्ये ते सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघून तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवडकरण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष शरद दादाजी जाधव ,उपाध्यक्ष,ज्ञानेश्वर अशोक मोरे,सुभाष पुंजाराम सोनवणे ,सचिव कृष्णा वाघ ,कार्याध्यक्ष भगवान दोधाजी माळी,कोषाध्यक्ष विजय अहिरे,सहसचिव अजय दादाजी बागुल,सल्लागार केशव मैघाने ,संघटक मनोहर सोनवणे ,प्रसिद्धी प्रमुख सोनू सोनवणे ,महिला प्रतिनिधी मनिषा अशोक माळी,सदस्य गोरख नाडेकर,सुभाष सुक्राम सोनवणे, प्रकाश पवार या प्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली आहे.
सभेला सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल, चिंधू आढळ कार्यकर्ते पुणे, मधुकर पाडवी तालुका अध्यक्ष पेठ, दादाजी बागूल कार्याध्यक्ष बागलाण, सुरेश पावरा तालुका अध्यक्ष नंदुरबार व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते. मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद जाधव यांची तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद जाधव यांनी निवनियूक्त सर्व सहकारी तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व समाजासाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निश्चय केला आहे. आदिवासी समाजावरील अत्याचार व अन्याय दूर करण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार असल्याचेे निवनियुक्त तालुका अध्यक्ष शरद जाधव यांनी या वेळी सांगितले.