दिलासादायक....
कोरोना अपडेट
मारेगाव तालुका १४ शहर ०१ बाधीत
-बरे होणार्यांची संख्या ४२
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील कोरोना संकट काही प्रमाणात दिलासादायक आहे.आरोग्य विभागाने तालुक्यात आज बुधवार ला केलेल्या तपासणीत केवळ १४ जन पॉझिटीव्ह आलेत.एका जनाचा मारेगाव शहरात समावेश आहे.सलग बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असतांना आज ४२ जन बरे झालेत.त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळतो आहे.
मारेगाव तालुक्यात मागील आठवड्यात कोरोना प्रादुर्भाव चांगलाच वाढला होता.त्यामुळे प्रशासना सह नागरीकात कमालीची चिंता वाढली होती.मात्र मागील दोन दिवसात बाधिताची आकडेवारीत घसरण होत आहे.
आज बुधवारला प्रशासनाने आर.टी.पी.सी.आर.१८७ तर रँपिड ४८१ जणांची तपासणी केली.यात रँपिड मधील किमान १४ जन पॉझिटीव्ह निघालेत.यातील ग्रामिण भागातील १३जन जन तर मारेगाव शहरातील एकाचा समावेश आहे.आर.टी.पी.सी.आर.तील अहवाल प्राप्त व्हायचा आहे.