सरकारी कर्मचारी बिरसा क्रांती दलात, सुशिलकुमार पावरा यांनी बनवली सुरगाण्याची नवीन बिकेडी टिम
प्रतिनिधी:रत्नागिरी
सुरगाणा: सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांना नाशिक जिल्ह्यातील तालुका शाखा बनविण्यासाठी मदत केली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुका शाखा तयार करण्याचे नियोजन झाले होते. त्यानूसार मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आल्या. त्यात लक्षवेधी ठरली ती सुरगाणा तालुक्याची बिरसा क्रांती दल ची नवीन टिम. कारण या तालुका शाखेमध्ये सरकारी कर्मचारी अधिक आहेत.
हे सरकारी कर्मचारी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, विद्युत महामंडळ, तहसील कार्यालय, पंचायत समिती इत्यादी विविध विभागात नोकरी करणारे आहेत. हे सगळे सरकारी कर्मचारी बांधव सुशीलकुमार पावरा यांच्या संपर्कातील आहेत. सर,आम्ही तुमच्या कामाला प्रभावित!! आम्हाला तुमच्या सोबत काम करायचंय!! असे म्हणत हे कार्यकर्ते बिरसा क्रांती दलात खुशी खुशी आले आहेत. या सर्व सरकारी कर्मचारी यांना एकत्र आणण्याचे काम गणेश गायकवाड व बळवंत पाडवी ह्या आदिवासी सरकारी बांधवांनी केले आहेत.म्हणून मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष व सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी या कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले आहेत. नाशिक जिल्ह्यात झपाट्याने तालुका शाखा विस्तार करण्यात आला.या कामात सुशीलकुमार पावरा यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी सुशिलकुमार पावरा यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 मे 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. या सभेत तालुका शाखा सुरगाणा निवड करून जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी मोहन गावीत यांची निवड करण्यात आली आहे. मोहन गावीत हे माध्यमिक शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघून सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. तालुका शाखा सुरगाणा पुढीलप्रमाणे आहे.
तालुका अध्यक्ष मोहन गावित सर ,उपाध्यक्ष अशोक गायकवाड सर ,तुळशीराम गावित सर , सचिव: बळवंत पाडवी सर ,कार्याध्यक्ष : भास्कर गायकवाड सर,कोषाध्यक्ष :चुनीलाल घांगळे सर हेमंत चौधरी सर ,सहसचिव: महेंद्र देशमुख सर,सल्लागार : तुकाराम अलबाड सर,महिला प्रतिनिधी :सुनंदा गायकवाड मॅडम ,तालुका संघटक: नितीन धूम ,योगेश भोये,प्रसिद्धी प्रमुख :गणेश गायकवाड ,योगेश वाघमारे, सदस्य दिनेश पवार डी भाई, गोपाळ गायकवाड,नारायण चौधरी ,प्रमोद वाघमारे, अशोक देशमुख सर , हिरामण गायकवाड,सुनील गुंबाडेयाप्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली आहे.
या सभेला सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, चिंधू आढळ पुणे कार्यकर्ते, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे, मधुकर पाडवी तालुका अध्यक्ष पेठ, दादाजी बागूल कार्याध्यक्ष बागलाण व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आदिवासी सरकारी कर्मचारी यांनी बिरसा क्रांती दल मध्ये जास्तीत जास्त संख्येने शामिल व्हावे व आदिवासी समाजासाठी बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून काम करावे, असे आवाहन सुशीलकुमार पावरा यांनी केले आहे.